नेमाने दर मंगळवारी देवळात येतो, पण I Am Afraid गेल्या मंगळवारी नाही येऊ शकलो, Workload खूप होता. बहुधा पुढच्या मंगळवारी पण नाही येणार, Client meet is so crucial. निर्लज्जासारखी कारणं बाप्पाला देत मी आज देवळात शिरलो.
मनाने नमस्कार करणं आम्हाला कधी जमलंच नाही, म्हणूनच हातांची मदत घेऊन, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य हे माझे जन्मसिद्ध हक्क आहेत, या आविर्भावाने मागू, किंबहुना हुकुम सोडू लागलो.
पैसा व उच्च-शिक्षणाने आलेला 'मी' पणा काही आम्हाला लपवता येत नाही. मोठं होण्याचा जीवघेण्या शर्यतीत, माणूस म्हणून आम्ही फार लहान झालो. लहानपणीच्या मित्रांना कट्ट्यावर भेटणे, छंद जोपासणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतः साठी जगणं आता इतिहासजमा झालं आहे. SLA, CTC, LPA हेच आमचे दया क्षमा शांती.
दिवाळीत(च) जग जिंकल्याच्या आनंदाने कपडे घेणारा मी, आता भकास चेहऱ्याने दर महिन्याला मॉल मध्ये Branded उधळपट्टी करतो. चहा म्हटलं की सिगरेट हवीच, बियर म्हणजे दारू नाही, दाबून पॅकेज छापणार आणि चाळीशीत निवृत्त होणार, या आमच्या श्रीमुखातून येणाऱ्या हमखास ओळी. निवृत्ती पुढील आयुष्य योजणारे आम्ही, दिवसभर एका खुर्चीत बसून, स्थूलता वाढवत, ताण घेत, गोर्यांची हाजी-हाजी करतं , आयुष्याची हानी कधी करून घेतो आमचं आम्हालाच कळतं नाही.
पैसा परमेश्वर नाही, हे जितकं लवकर कळेल, तितकं लवकर माणसं, प्रेम, जिव्हाळा, निसर्ग, या सारखे outdated वाटणारे अनमोल शब्द आम्हाला कळतील. पैसा महत्वाचा आहेच. दानपेटीशिवाय तर गाभाराही पूर्ण होत नाही, पण आयुष्यात सुख आणि पैसा यात अद्रुष्य रेखा आखायचं ठरवलं .
देवाला प्रथमच मनातून नमस्कार केला, मागीतला काही नाही फक्त आभार मानले आणि आश्वासन दिलं , आयुष्य खूप सुंदर आहे त्याला मी आणखी सुंदर बनवणार
इतक्यात एक ईश्वररुपी स्वर माझ्या कानावर पडला, भुकेल्याला अन्न दे, दिव्यांगांना, गरजूंना मदतीचा हात दे, दुखींना हास्य दे. आयुष्य हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे त्याला राग लोभ मोह मत्सर यात का बरे घालवावे !
तरं माझ्या Consultantन्नो , दुपारी दमून झोपलेल्या आई ला न सांगता चहा करून उठवा, नुकते रिटायर झालेले बाबा घरी एकटे कंटाळतात, त्यांना त्यांच्या ऑफिस च्या आठवणी विचारा, जप करतं बसलेल्या आजीचा हळूच पापा घ्या, आजोबांचा वाढदिवस दिमाखात साजरा करा, मग बघा बँकेच्या खात्यात पैसे व आयुष्याच्या खात्यात सुख कसा जमा होतं.
आशा आहे तुम्हाला माझा ब्लॉग आवडला/पटला असेल व तुम्ही त्याला On-Hold टाकणार नाही :)

१ नंबर मित्रा..खरच खूप छान !!
ReplyDelete